
दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही ; अपना वतन संघटनेला आयुक्तांचे आश्वासन
जितेंद्र गवळी-वृत्तशक्ती न्युज
पिंपरी- महापालिकेचे आर्थिक नुकसान करत नियमबाह्य, बेकायदेशीर कामकाज करणा-या करसंकलनच्या निलेश देशमुखसह दोषी अधिकारी- कर्मचा-यांचे सेवानिलंबन करुन विभागीय चौकशीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक २१ मार्च रोजी पिंपरी चिचंवड मनपासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले . अपना वतन संघटनेच्या वतीने दिनांक ४ जाने २०२३ व १५ मार्च २०२३ रोजी करसंकलन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती. त्यामध्ये विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द , नोटराइज्ड दस्ताद्वारे मिळकत नोंदणी , ओरिअन्स प्रो सोल्युशन्स कंपनीचा बोगस सर्व्हे ,एकाच दस्तावर ३१ नोंदी , अनेक व्यावसायिकांचा कोट्यवधींचा कर माफ , सामान्य नागरिकांकडून वसुली केली जात असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मिळकतीची नोंद नाही त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान , नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न , तृतीयपंथीयांच्या तक्रारींवर चौकशी अशा अनेक मुद्यांबाबत पुराव्यासह कागदपत्रे दिलेली आहेत. परंतु आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून करसंकलन विभागातील बेकायदेशीर गोष्टींना जबाबदार निलेश देशमुख यांच्यासहित दोषी अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घातले जात आहे असा आरोप करीत आज आंदोलन करण्यात आले . त्यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली . यावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी आयुक्तांना करसंकलन विभागातील भ्रष्टाचाराच्या बाबत जाब विचारात प्रत्येक मुद्यानुसार पुरावे सादर करीत आपले म्हणणे मांडले व निवेदन सादर केले त्यामध्ये यामध्ये त्यांनी १) भ्रष्ट सहायक आयुक्त निलेश देशमुख यांची हकालपट्टी करुन शासन परत सेवेत पाठवा . २) सर्व विभागीय कार्यालयाच्या गैरकारभाराची ‘स्वतंत्र चौकशी समिती’द्वारे दप्तर तपासणी करून त्यांची विभागीय चौकशी करा .
३)विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द करुन पुन्हा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार द्या. ४)ऑरिअन्स प्रो सोल्युशन कंपनीने केलेल्या बोगस सर्व्हेचेऑडिट करा.
५) तृतीयपंथीयांच्या तक्रारीवर चौकशी समिती गठीत करा. ६)अधिकारी-कर्मचा-यावर केलेल्या नियमबाह्य बक्षिसांची वसुली करा.
७) चिखली-तळवडेतील नोटीस दिलेल्या कर्मचा-यांना निलंबन करुन विभागीय चौकशी करा. अशा मागण्या केल्या . यावेळी आयुक्तांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही तसेच सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करणेत येईल तसेच असे लेखी पत्र सिद्दीकभाई शेख यांना देण्यात आले . त्यामुळे अपना वतन संघटनेचे सुरु असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. या वेळी अपना वतन संघटनेच्या महिला शहरध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , संघटक प्रकाश पठारे , हाजीमलंग शेख , गणेश जगताप , तौफिक पठाण , अतिक अत्तार , अमर माने , सलीम शेख , अब्दुल अजीज , सुमित बिस्वास , ताहेर भालदार , समीर बागवान आदीजण उपस्थित होते .