
पिस्टल व गांजासह सराईत गुन्हेगारास साथीदारासह अटक
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी
जितेंद्र गवळी-वृत्तशक्ती न्युज
भोसरी- दि. १८/०३/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंदयांची माहीती काढण्याकरीता, हिजवडी, मारुजी, कासारसाई भागात पेट्रोलिंग करुन, मौजे पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे येथे आले असता, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर घोलप हा त्याचे साथीदारासह दुचाकीवरून, पुसाणे गावाकडे येत असुन, त्याचेकडे पिस्टल व गांजा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सपोनि उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला बीफ करून सितमाला बंगल्यासमोरील रोडवर मौजे मुसाणे, ता.मावळ, जि. पुणे येथे सापळा लावुन, दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेले मयुर अनिल घोलप, वय- २९ वर्षे रा. लक्ष्मीगंगा अर्पाटमेंट, फ्लॅट नं.१९, पागेची तालीम, चिंचवडगाव, पुणे सध्या रा. पुसाणे, ता. मावळ, जि.पुणे व शंभू संजय गंगावणे वय २१ वर्षे, रा. धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड जिल्हा सातारा यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता आरोपी मयुर घोलप याचे ताब्यात ४०,०००/-रु. किं.चे एक पिस्टल, ६५,०००/-रु. किमतीची दुचाकी मोपेड गाडी, तसेच आरोपी शभु गंगावणे याचे ताब्यात ३१,०००/-रुपये किंमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ असा एकुण १,३६,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने, तो जप्त करुन, त्यांचेविरुध्द शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे गुरनं. ८२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ व एन.डी.पी.एस. अॅक्ट
कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मयुर घोलप हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुद्ध दरोडा, खुन करण्यासाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, सदोष मुनष्य वधाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश भावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.