
कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान च्या वतीने दीपावली निमित्त म न पा च्या आरोग्य कर्मचाऱ्यास मिठाई वाटप
जितेंद्र गवळी-वृत्तशक्ती न्युज
चिंचवड- कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान च्या वतीने दीपावली निम्मित पिंपरी चिंचवड म न पा च्या आरोग्य विभागातील पूर्णा नगर, शिवतेज नगर येथील सफाई कर्मचारी यांना मिठाई चे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान च्या वतीने गेली १८ वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अशी माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. नगर सेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. त्यांची हि दिवाळी गोड व्हावी म्हणून दर वर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो असेही ते म्हणाले.. या प्रसंगी सुनील कदम, शैलेश बापु मोरे, राजु गुणवंत, कैलास सराफ, शोभा नलगे, क्षमा काळे इ. उपस्थित होते. सर्व सफाई कामगारांना मिठाई चे वाटप करून दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या.