सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने रात्री उशीरापर्यंत चालणा – या पिंपरी येथील सलोनी बार वर कारवाई
वृत्तशक्ती न्युज :- पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २७/०८/२०२१ रोजी २३.४५ वा . पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साई चौक पिंपरी पुणे येथील सलोनी बारचे मालक राजेश लालवानी हे त्याचे सलोनी बार मध्ये गिहाईकांना बसण्यास परवागी देऊन शर्ति पेक्षा जास्त वेळ बार चालू ठेवुन बारमध्ये ३५ ते ४० लोकांना जमवुन मानवी सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करून , कोरोना या साथीच्या रोगाची संसर्ग पसरवण्याची हयगयीची कृत्य करीत आहेत .
अशी बातमी मिळताच पिंपरी येथील सलोनी बार वरती कारवाई करण्यात आली आहे . सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन दिनांक २८/०८/२०२१ रोजी रात्री १२.३० वा . छापा टाकला असता एकुण ४६ ग्राहक बारमध्ये मिळून आले तसेच ७,१०० / – रू.कि. रोख रक्कमेचा मुद्देमाल आरोपी क्रमांक ०१ चे ताब्यात मिळुन आला
इसम नामे १ ) राजेश कनैय्या लालवानी वय ४८ वर्षे रा . पंचवटी सोसायटी , पिंपरी कॉलनी , पिंपरी , पुणे . ( बार मालक )
२ ) अराफत मोजरिम मंडल वय २४ वर्षे रा . साई चौक पिंपरी पुणे . ( वेटर )
३ ) हबीबुल माफीजुल शेख वय १ ९ वर्षे रा . सदर ( वेटर )
४ ) कौसीक अनारूल मुल्ला वय २१ रा . सदर ( कुक ) यांचे विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ६७७/२०२१ भा.द.वि. कलम १८८,२६ ९ , २७०,३४ साथीचा रोग अधिनियम १८ ९ ७ कलम ३ , राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) महा.कोवीड १ ९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद असे . तसेच सदर हॉटेलमध्ये सुरक्षीत अंतर ठेवले नाही म्हणुन ४६ ग्राहकाकडुन एकुण २३,००० / – रु दंडाच्या शासकीय पावत्या केलेल्या आहेत .
सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ अति . कार्यभार पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री . आनंद भोईटे , मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . डॉ . प्रशांत अमृतकर , सपोनि डॉ . अशोक डोंगरे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार सपोफौ कांबळे , पोहवा ५३५ शिरसाट , पोहवा ४२६ बर्गे , पोहवा लोंढे , पोना ४ ९ १ मुठे , पोना १५३६ करचुंडे , पोना १७६८ कारोटे , पोना १२ ९ ७ गारे , मपोना १३७८ जाधव , मपोशि २५६ ९ माने यांनी केली आहे