वृत्तशक्ती न्युज :-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस असलेले पोलीस उप निरीक्षक मिलन कुरकुटे हे दिनांक २१/०८/२०२१ रोजी पासुन रुग्णनिवेदन रजेवर होते . परंतु दि . २४/०८/२०२१ रोजी ते रूग्ण निवेदन कालावधीमध्ये असताना देखील त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल कार्निव्हल येथे शासकीय गणवेशासह जावुन तेथील हॉटेल मालक व मॅनेजर यांचेशी हुज्जत घालून पैशाची मागणी केली
याबाबतची माहिती मुंढवा पोलीस ठाणे , पुणे शहर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे कळविण्यात आल्यानंतर मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांना त्यांच्या या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणा – या अशोभनीय कृत्याबद्दल त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे .
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचेवर भारतीय संविधान अनुच्छेद ३११ , २ ( ब ) अन्वये सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे .